गंगाखेड (परभणी) : हिंदू समाजाचे ऐक्य, संघटन आणि संस्कृती संवर्धनासाठी गंगाखेड तालुक्यातील ईसाद येथे रविवार, २९ मार्च २०२६ रोजी एका भव्य ‘हिंदू संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या माध्यमातून हिंदू जागरणाचे कार्य अधिक प्रभावीपणे मांडले जाणार असून, संपूर्ण परिसरातून हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
हे संमेलन रविवार, २९ मार्च रोजी सायंकाळी ६:३० वाजता ईसाद येथील शिवस्मारक, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संपन्न होईल.
या संमेलनाला आध्यात्मिक आणि हिंदुत्ववादी विचारांचे दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हिंदुतेजसूर्य धनंजय भाई देसाई (संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदुराष्ट्र सेना) हे उपस्थितांना मार्गदर्शन करतील. त्यांच्या रोखठोक भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रमुख वक्ते: माणिकराव माठे (प्रचार प्रमुख, परभणी विभाग) हे विचार मांडतील.
प्रमुख उपस्थिती: गुरुवर्य सोमयागी यज्ञेश्वर महाराज सेलुकर यांची वंदनीय उपस्थिती लाभणार आहे.
अध्यक्ष: या कार्यक्रमाचे अध्यक्षपद दिगांबरराव आबा सातपुते भूषवणार आहेत.
“हिंदू संस्कृतीच्या रक्षणार्थ आणि समाजाच्या बळकटीकरणासाठी हे संमेलन मैलाचा दगड ठरेल. ईसाद आणि गंगाखेड परिसरातील सर्व हिंदू बंधू-भगिनींनी आपल्या मित्र परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र सोहळ्याची शोभा वाढवावी,” असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.