Sunday, November 24, 2024

सिंचन घोटाळ्यात तथ्य; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

Share

महाराष्ट्र : कथित 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्या (Maharashtra Irrigation Scam) संदर्भात तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या भाजप नेत्यांनी या मुद्द्यावरून तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र हेच अजित पवार आता भाजपसोबत (BJP) सत्तेत सहभागी झाल्याने सिंचन घोटाळ्याच्या आरोपांचं काय झालं, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एका मुलाखतीदरम्यान प्रश्न विचारण्यात आला. तेंव्हा मी केलेल्या घोटाळ्यातील आरोप खरे ठरल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

दरम्यान, “मी केलेले सर्व आरोप नंतर खरे ठरले आहेत. मी जे मुद्दे उपस्थित केले होते, त्यावरून कारवाईही करण्यात आली आहे. त्या प्रकरणातील आरोपींवर गुन्हे दाखल करून चार्जशीटही दाखल करण्यात आली आहे. काही लोक दोषी ठरले आहेत. यामुळे सिंचन खात्यातील काही नियमांची दुरूस्तीही करण्यात आली, याचं मला समाधान आहे. या खात्यात होणारा भ्रष्टाचार नंतर बंद झाला आणि टेंडर प्रक्रियेत पारदर्शकता आणली गेली,” अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

सिंचन घोटाळ्यात तथ्य आहे. हा घोटाळा ज्या काळात घडला, त्यावेळी अजित पवार हे त्या खात्याचे मंत्री होते. त्यामुळे त्यांच्यावर आरोप होणे साहजिक आहे. त्याच मुद्यावरून आम्ही त्यांच्यावर आरोप केला होता. मुळात त्या खात्याचे मंत्री असल्याकारणाने त्यांना जबाबदार धरणे स्वाभाविकच होते. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर आरोप केले. मात्र, तपासानंतर कोणत्याही आरोपपत्रात किंवा तपास यंत्रणांनी अजित पवार यांची थेट भूमिका असल्याचे म्हटलेले नाही. असा आरोप झाल्यानंतर तपासाला सामोरे जावे लागते, असं फडणवीस म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख