Monday, December 30, 2024

जल जीवन मिशन: कोट्यवधी घरांमध्ये नळाद्वारे पाणी

Share

देशाच्या ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला घरी स्वच्छ आणि पुरेसे पाणी स्वतंत्र नळा द्वारे २०२४ पर्यंत पोहोचवण्यासाठी जल जीवन मिशनची स्थापना करण्याची घोषणा १५ ऑगस्ट २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. आपल्या सरकारच्या दुस-या कार्यकाळातील त्यांची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्यानुसार सुरु केलेल्या या मिशन अंतर्गत प्रत्येक भारतीय घराला बंद नळातून स्वच्छ व शुद्ध पाणी देण्या बरोबरच वापरलेल्या पाण्याचा फेरवापर आणि पर्जन्य जल संधारणाच्या (रेन वाटर हार्वेस्टींग) माध्यमातून म्हणजेच पाणी जिरवून पाणी साठ्याची शाश्वतता निश्चित करणे या कामांचा देखील समावेश आहे.

जल जीवन मिशन ही जन भागीदारीतून राबवली जात असलेली योजना आहे. या योजने द्वारे केंद्र सरकारने राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश यांना साहाय्य करणे, त्यांचे सबलीकरण करणे आणि त्यांना सुविधा व आर्थिक साहाय्य पुरवणे ही कामे केली आहेत. या योजनेत ग्रामीण भागातील लोकसेवा आस्थापना म्हणजे ग्राम पंचायत इमारत, शाळा, प्राथामिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी केंद्र यांचा देखील समावेश केला आहे. या सर्व ठिकाणी घरगुती नळ कनेक्शन देण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

योजनेचा वेग
ही योजना जाहीर करण्यात आली तेव्हा म्हणजेच १५ ऑगस्ट २०१९ रोजी भारतामध्ये ३ कोटी २३ लाख ६२ हजार ८३८ घरामध्ये स्वतंत्र नळ जोडणी अस्तित्वात होती. सन २०२२ अखेरीस ही संख्या ११ कोटी ४७ लाख १३ हजार ४९५ झाली. म्हणजेच या योजने अंतर्गत पहिल्या ३ वर्षात ८ कोटी २३ लाख ५० हजार ६५७ घरांमध्ये नळ जोडण्यात आले.

२०१४ साली सत्तेवर येण्यापूर्वी आपल्या देशातील साऱ्या जनतेला त्यांच्या जीवनमानात सुधारणा करून त्यांना आत्मसम्मान मिळवून देण्याचे आणि मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे वचन देण्यात आले होते. ते वचन केंद्रातील सरकारने विविध योजना आणि अभियाने यांच्या माध्यमातून पूर्ण केले आहे.

प्रतिनिधी, NB Marathi

अन्य लेख

संबंधित लेख