Sunday, September 8, 2024

लाडका भाऊ योजना

Share

महायुती सरकारने राज्यातील सर्व घटकांच्या विकासाच्या दृष्टीने नवनवीन योजनांची मालिका सुरू केली आहे यामध्ये सरकारने महिला आणि मुलींना आधार देण्यासाठी ‘लाडकी बहिण योजना’ आणि शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना’ यासारख्या योजना सुरू केल्या आहेत. आता राज्यातील युवकांसाठी एक उपयुक्त योजनेची घोषणा केली आहे ती आहे मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना.

दरवर्षी राज्यातील युवकांना मोठ्या संख्येने नोकरी व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडावे लागते अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करण्यात अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागते. ह्याच तरुणांच्या समस्या मिटवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका भाऊ योजनेची घोषणा केली आहे.महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभाग आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्ररिक्षण योजना राबवली जाणार आहे.

या योजनेंतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील. रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमतावाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवइ्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्ररिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईंल.

या लाडका भाऊ योजनेमधील लाभ

या योजनेमध्ये लाभार्थी पात्र व्यक्तीला दरमहा विद्या वेतन दिले जाणार आहे. यामध्ये बारावी उत्तीर्ण तरुणांना दरमहा सहा हजार रुपये डिप्लोमा धारकांना आठ हजार रुपये आणि पदवीधारकांना दहा हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे.

या योजनेची पात्रता

1)उमेदवाराचे किमान वय १८ व कमाल ३५ वर्ष असावे

2)उमेदवाराची किमान औैक्षणिक पात्रता १२्वी पास/। आयटीआया/ पदविका/ पदवी/ पदव्युत्तर असावी.

3)उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा उमेदवाराची आधार नोंदणी असावी,

4)उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे

5)उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या सकतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.

या कार्य प्रशिक्षणचा कालावधी ६ महिने असेल. सदरच्या सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येइल, प्ररिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित प्रशिक्षण यरशस्वीरित्या पूर्ण केल्याचे विहित प्रमाणपत्र देण्यात येईल.

या योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन प्रशिक्षणार्थीच्या थेट बँक खात्यात ऑनलाइन (DBT) पद्धतीने दरमहा अदा करण्यात येइेल.

या योजनेंतर्गत प्ररिक्षणार्थी महिन्यातून 10 दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असला तर, सबंधित प्रशिक्षणार्थीस त्या महिन्याचे विद्यावेतन मिळणार नाही. प्ररिक्षणार्थीने वरील अटींची पूर्तता केली असली परंतु सदर प्ररिक्षणार्थी पहिल्याच माहिन्यात प्ररिक्षण सोडून गेल्यास तो विद्यावेतनास पात्र राहणार नाही

अन्य लेख

संबंधित लेख