भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर लालबहादूर शास्त्री यांनी या देशाच्या संरक्षण सिद्धतेमध्ये आपल्या प्राणाची पर्वा न करता अथकपणे प्रयत्न करणाऱ्या जवानांना सन्मान देण्यासाठी व प्रोत्साहित करण्यासाठी जय जवान – जय किसान ही घोषणा दिली होती. या घोषणेतील “जय जवान” या म्हणण्यामध्ये जवानांना मान देण्याचा – आदर करण्याचा लालबहादूर शास्त्री यांचा हेतू होता. परंतु लालबहादूर शास्त्री यांचे लवकरच देहावसन झाले व जवानांना खऱ्या अर्थाने आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज करून त्यांना सक्षम बनविण्याचे लालबहादूर शास्त्रींचे स्वप्न अधुरे राहिले.
शास्त्रीजींच्या निधनानंतर सत्तेवर आलेल्या प्रत्येक काँग्रेस नेतृत्वाने जवानांकडे दुर्लक्ष केले, एवढेच नव्हे तर काँग्रेस सत्ता नेतृत्वांच्या देहबोलीतून भारतीय सैनिकांना जणू ते वेठबिगारी समजूनच काम करतायेत हेच जाणवायला लागले. ना जवानांना सन्मान होता, ना त्यांना आवश्यक सुविधा देण्याचा प्रयत्न झाला. जवानांना शस्त्रसज्ज बनविण्यात आले नाही की त्यांना देशाच्या संरक्षणासाठी पूर्णपणे स्वातंत्र्यही देण्यात आले नाही. अशा अनेक गोष्टींमुळे काँग्रेसने भारतीय सैन्याची थट्टाच केली व जय जवान अशी घोषणा देणाऱ्या लालबहादूर शास्त्रींच्या संकल्पाला सुरुंग लावला. लालबहादूर शास्त्रींच्या जय जवान घोषणेला जणू तिलांजली देण्याचाच विडा काँग्रेसने उचलला होता, म्हणूनच भारतीय सैन्याचे मनोधैर्य खचत गेले.
अनेक आक्रमणाच्या प्रसंगी वेळेवर निर्णय न घेतल्यामुळे भारतीय जवानांना आपल्या प्राणाचे मोल द्यावे लागले. डाव्या विचारांच्या लोकांनी काँग्रेसचा ताबा घेतल्यामुळे चीनने केलेल्या आक्रमणानंतर असो अथवा नक्षलवाद्यांच्या विरोधात कारवाई करताना असो काँग्रेसच्या धडसोड वृत्तीमुळे जवानांना आपले प्राण गमवावे लागले. नक्षलवादी चळवळीला दुसऱ्या बाजूने छुपा पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसने कायमच जवानांचा विश्वासघात केला, त्यामुळेच लालबहादूर शास्त्री यांनी जी *जय जवान* घोषणा दिली होती, त्या घोषणेला कायमच काँग्रेसच्या नेतृत्वाने संपविण्याचे प्रयत्न केले.
खरा सन्मान सन २०१४ पासूनच सुरू झाला
श्री. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी भारतीय जवानांना प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्न केला. केवळ बोलण्यातून नव्हे तर कृतीतून नरेंद्र मोदी यांनी जवानांना सन्मान मिळवून दिला व जवानांसाठी आवश्यक गोष्टीही केल्या.
- आपला वाढदिवस असो की दिवाळी असो, या निमित्ताने नरेंद्र मोदी हे भारतीय सैनिकांबरोबर हा आनंदोत्सव साजरा करताना गेल्या दहा वर्षांपासून दिसत आहेत.
- केवळ ही दाखवायची गोष्ट नरेंद्र मोदी यांनी केली नाही तर संरक्षण सज्जता करून सैन्याला जास्तीत जास्त सुविधा देण्याचा यशस्वी प्रयत्नही केला आहे.
- भारतीय सैन्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा शासनाने निर्माण करून दिल्या आहेत.
- आधुनिक शस्त्रास्त्रे, लढाऊ विमाने यांची आवश्यकतेनुसार सरकारने आयातही केली आहे.
- भारतीय स्वदेशी बनावटीची शस्त्रास्त्रे निर्माण करण्यासाठी सरकारने प्रोत्साहन दिले आहे.
- वन रँक – वन पेन्शन ही अनेक वर्षांची भारतीय जवानांची न्याय्य मागणी सरकारने पूर्ण केली आहे.
- जवानांना मूलभूत सुविधा देण्यासाठी सरकारने अथक परिश्रम घेतले आहेत.
- अग्निवीर सारखी योजना आणून अधिकाधिक सैनिक भरती केली आहे.
- सैन्य भरतीतील भ्रष्टाचार व गोंधळ कमी करून योग्य व्यक्तींची सैन्यामध्ये भरती सुरू केली आहे.
- संपूर्ण जगभर प्रवास करून नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाच्या बाजूने जणू जगालाच उभा केले आहे, त्यामुळे आपल्या देशावर होणारे आतंकवादी हल्ले थांबल्यामुळे सैनिकांचे मनोधैर्य वाढले आहे.
- देशाच्या बाहेरून होणारे हल्ले व देशाच्या अंतर्गत होणारी दंगल या दोन्ही गोष्टींना अटकाव केल्यामुळे भारतीय जवानांना आपल्या मुख्य कामाकडे लक्ष द्यायला वेळ मिळत आहे, त्यामुळे देशाच्या सुरक्षेमध्ये वाढ झाली आहे.
- हा देश माझा आहे ही भावना या सरकारने तयार केल्यामुळे सामान्य व्यक्तींच्या मनात भारतीय जवानांबद्दलचा आदर वाढला आहे.
अशा अनेक गोष्टींमुळे लालबहादूर शास्त्रींच्या घोषणेची खऱ्या अर्थाने श्री.नरेंद्र मोदी यांच्या सरकारनेच अंमलबजावली केली आहे असेच म्हणावे लागेल. काँग्रेसच्याच एका नेतृत्वाने दिलेल्या जय जवान घोषणेची खिल्ली उडविणाऱ्या काँग्रेसच्याच नेत्यांना श्री.नरेंद्र मोदी यांनी चोख उत्तर दिले आहे. आज भारतात खऱ्या अर्थाने जय जवान आपण म्हणू शकतो. जय जवान या शब्दाच्या पुढे जय किसान असे लालबहादूर शास्त्रींनी म्हटले होते. परंतु गेल्या ७० वर्षांमध्ये काँग्रेसने कायमच शेतकरी व ग्रामीण भागाला उपेक्षित ठेवून या घोषणेचाही अवमानच केला होता.
यासंदर्भातील विद्यमान सरकारचे कामही किसानांना आदर देण्याचेच झाले आहे. खऱ्या अर्थाने जय जवान – जय किसान या घोषणेला श्री.नरेंद्र मोदी यांनी एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे व लालबहादूर शास्त्री यांचे स्वप्न साकार केले आहे. लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!