Thursday, November 7, 2024

विधानपरिषदेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी

Share

मुंबई : विधानपरिषदेसाठी (Legislative Council) नवनिर्वाचित झालेले सदस्य निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) आणि जगन्नाथ अभ्यंकर (Jagannath Abhyankar) यांना उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी आज सदस्यत्वाची शपथ दिली. निरंजन डावखरे हे कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून तर जगन्नाथ अभ्यंकर हे मुंबई शिक्षक मतदारसंघातून निवडून आले आहेत. नाशिक शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले किशोर दराडे मुसळधार पावसामुळे शपथविधीसाठी मुंबईत पोहोचू शकले नाहीत.

सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सभागृहाला नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय करून दिला. यावेळी उपसभापती डॉ.गोऱ्हे यांच्यासह सभागृहातील उपस्थित सर्व सदस्यांनी दोन्ही सदस्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अन्य लेख

संबंधित लेख