Saturday, May 25, 2024

महाराष्ट्राच्या ४८ लोकसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांची ‘रोजची अपडेट’ फक्त एका क्लिकवर

Share

लोकसभा असो, विधानसभा असो किंवा ग्रामपंचायत असो, माध्यमांसाठी निवडणुकीचा काळ अगदी धामधुमीचा असतो. पण सुरुवातीच्या निवडणुका आणि अलीकडच्या, विशेषतः २०२४ ची ही निवडणूक यात प्रचंड फरक जाणवतो आहे. हा फरक तंत्रज्ञानाचा आहे. याचा विचार केला, तर २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अतिशय प्रभावी वापर पहिल्यांदा झाला. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षाने हे तंत्रज्ञान, सोशल मीडिया याचा अगदी कल्पकपणे वापर केला. यामुळे एरवी निवडणुकीबद्दल उदासीन असणारा तरुण वर्गही तिकडे उत्सुकतेने बघू लागला. कारण परत तेच, थेट व्यक्तिशः त्याला साद घालणारे तंत्रज्ञान! हे त्यावेळी प्रामुख्याने त्याचे माध्यम मानले जात होते. त्याद्वारे कोणीतरी त्याच्यापर्यंत पहिल्यांदाच पोचले होते, त्यानेही त्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. तोपर्यंत तंत्रज्ञान, समाज माध्यम याबाबतीत मतदार सोडाच, विरोधकही बेसावध होते. इतके की त्यांना अशी काही माध्यमे आहेत, याची कल्पना तरी होती की नाही असा संशय यावा.

मात्र, तेव्हापासून ‘तंत्रज्ञान’ ‘समाज माध्यम’ हे शब्द, आजच्या भाषेत बोलायचे तर ‘की वर्ड – परवलीचे शब्द’ झाले. पुढच्या २०१९ च्या निवडणुकीत विरोधकांनीही या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. पण बाजी पुन्हा नरेंद्र मोदी यांनीच मारली. याचा अर्थ केवळ तंत्रज्ञानामुळे त्यांनी आधीची निवडणूक जिंकली असे म्हणता येणार नाही. पण पारंपरिक व्यूहनीतीला आधुनिक टच देऊन विरोधकांसह मतदारांनाही चकित करणारा डाव मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा टाकला आणि जिंकलाही. अर्थात केवळ मतदार, विरोधकच नाही; माध्यमकर्मींनाही हे त्यावेळी नवीनच होते. प्रिंट मीडियाला नवीन तंत्रज्ञानाचा परिचय झालेला असला, तरी तंत्रज्ञानाबरोबर त्यांची आता आहे तितकी मैत्री तोपर्यंत झालेली नव्हती. इंग्रजी व मराठीसह इतर भाषेतील काही माध्यमसमूहांनी बातम्यांसाठी इंटरनेट वगैरेचा वापर सुरू केला असला, तरी ते तेवढे रुळले नव्हते. पण २०१४ ची निवडणूक सगळ्यांसाठीच एका अर्थाने ‘आय ओपनर’ ठरली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर विकासासाठी, प्रगतीसाठी कसा करता येऊ शकतो, याची जाणीव संस्थांपासून व्यक्तींपर्यंत सगळ्यांना झाली.

त्याचाच परिपाक म्हणजे, ‘एनबी मराठी’ या वेब पोर्टलवर एका क्लिकवर (लोकसभा २०२४) महाराष्ट्राच्या लोकसभा मतदारसंघांतील प्रमुख उमेदवार दिसतात. उमेदवारांच्या एक्स (ट्विटर) व फेसबुक अकाउंटवर त्यांनी काय माहिती टाकली आहे हे दिसते. त्यांचे दौरे, त्यांचे कार्यक्रम, त्यांचे अजेंडे, कोणी कोणत्या मुद्द्याला महत्त्व दिले आहे, त्यांचे व्हिजन काय आहे इत्यादी सगळे यावरून कळू शकते. अर्थात हे उमेदवार आपले अकाउंट सतत अपडेट करत असतील तरच! ही सगळी सोय बघून, एका क्लिकवर मिळू शकणाऱ्या या माहितीसाठी आपल्याला किती फिरावे लागायचे, हे मला आठवले. केवळ पुण्यापुरते बोलायचे, तर उमेदवारांशी संपर्क साधून त्यांचे कार्यक्रम समजून घ्यायचे. जिथे सभा असतील तिथे मिळेल त्या वाहनाने पोचायचे. त्यांच्या पदयात्रा, कोपरासभा, मेळावे कव्हर करणे (लोकसभेसाठी वेगळी स्ट्रॅटेजी असू शकते) असे फिरून माहिती गोळा करावी लागायची. मतदारांबरोबर बोलायचे, गावातील वातावरण समजून घ्यायचा प्रयत्न करायचा – स्थानिक लोकांचे महत्त्व खूप असते आणि त्यानंतर रोजच्या बातम्यांबरोबरच दर आठवड्याला वातावरण, मतदारांचा कल सांगणारे वार्तापत्र लिहायचे अशी साधारण पद्धत होती. त्यावेळी आत्ताइतकी धावपळ नव्हती. जीवनाला इतका वेग नव्हता. इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता, इंटरनेट, मोबाईल नव्हते, तरीही स्पर्धक वर्तमानपत्रापेक्षा आपली बातमी, माहिती लवकर प्रसिद्ध व्हावी. आपला मजकूर वेगळा ‘एक्सक्लुसिव्ह’ असावा अशी स्पर्धा होतीच. ती धावपळ होतीच.

पण ‘एनबी मराठी’ या वेब पोर्टलने ही धावपळही कमी करून टाकली आहे. आपल्या सोयीने (आणि डेडलाईन लक्षात घेऊन) कधीही, अगदी वातानुकूलित खोलीत बसून एका क्लिकवर सगळी माहिती कुठेही न जाता आता मिळत आहे. त्यासाठी उन्हात फिरणे नको की कसली धावपळ नको. महत्त्वाचे म्हणजे ही सगळी माहिती वाचताना आपण व्हिडिओही बघता येतात. त्यावरूनही खूप काही कळू शकते. उमेदवारी अर्ज भरायला जाताना उमेदवारांबरोबर पत्रकारही जात – आजही जातात, पण आता कधीही यासंबंधीचे व्हिडिओ या वेब पोर्टलवर बघता येऊ शकतात. उमेदवार आपापल्या अकांउंटवर ते टाकत असतात. त्याचे संकलन या वेब पोर्टलवर असते. गंमत म्हणजे, केवळ पत्रकारच नाही, मतदारही ते बघू शकतात. ‘एनबी मराठी’ या वेब पोर्टलने ही सोय सगळ्यांनाच उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे केवळ वाचून नाही, तर व्हिडिओ बघून उमेदवाराबाबतचे ‘मत’ आता मतदारांना, वाचकांनाही घरबसल्या तयार करता येऊ शकणार आहे. फक्त मतदानासाठी बाहेर पडावे लागणार आहे, ते त्यांनी आवर्जून करावे.

बदलत्या काळाप्रमाणे खूप काही बदलले. राजकारण बदलले, ते करणारी माणसे बदलली, निवडणूक, प्रचारतंत्र, मतदान याचेही स्वरूप बदलले. हे सगळे वाचकांपर्यंत पोचवणारे माध्यमही बदलले. या बदललेल्या, अत्याधुनिक, तंत्रस्नेही माध्यमांचा प्रमुख आणि महत्त्वाचा प्रतिनिधी म्हणजे ‘एनबी मराठी’ हे वेब पोर्टल होय. आमच्या या वेब पोर्टलवर निवडणुकीच्या प्रचारापासून मतदान, निकाल आणि त्यानंतरच्याही घडामोडींची विश्वासार्ह, अधिकृत माहिती नेहमीच मिळत राहणार आहे. जरूर फॉलो करा – marathi.newsbharati.com/social/

अन्य लेख

संबंधित लेख