Thursday, October 10, 2024

जरांगेंनी मराठ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम केलं; मराठे मनोज जरांगेंचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत

Share

आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यात दोन दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोघांनी एकमेकांना चांगलच सुनावलं यात आता भाजपा नेत्यांने मनोज जरंगे यांना चांगलाच सुनावलं आहे “ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटलांची वक्तव्ये येत आहेत. याला मस्ती आणि माज नाही म्हणायचं तर आणखी काय म्हणायचं? विरोधात बोलणार प्रत्येक जण देवेंद्र फडणवीसांचा माणूस आहे म्हणतात. प्रत्येक जण हा भाजपचा माणूस म्हणतात. हा मात्र शरद पवार आणि महाविकास आघाडीचा माणूस आहे. ज्या पद्धतीने जरांगेंनी मराठ्यांचं नुकसान केलं. ईडब्लूएस बद्दल चुकीची माहिती दिली. मराठ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम केलं. एक दिवस हेच मराठे मनोज जरांगेंचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत”, असे भाजप नेते आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) म्हणाले आहे.

प्रसाद लाड पुढे म्हणाले, “मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगितलं. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर चर्चेला या. देवेंद्र फडणवीसांची चूक दाखवा. ज्या वेळी मी बोललो, प्रवीण दरेकर बोलले. त्यानंतर हे सर्व नेते आणि मराठा आमदार बोलले असते. तर तुमच्यावर चढलेल्या माजाची चादर टराटरा फाटली असती. राजेंद्र राऊतांना म्हणता तुम्हाला घरात येऊन बघून घेतो. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर महाराष्ट्रात 288 उमेदवार उभे करा. राजा तुमच्यामागे आम्ही मराठे एक आहोत. ताकदीने उभे राहू. याचा ढोंगीपणा उघड करु,” अशी टीका प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांच्यावर केलीये.

अन्य लेख

संबंधित लेख