Sunday, October 13, 2024

मराठा समाजाचा ‘लाडकी बहीण’ योजनेचा कार्यक्रम उधळवून लावण्याचा इशारा; शिंदे-फडणवीस-पवार यांना सोलापूरात पाय ठेवू देणार नाही

Share

सोलापूर : सोलापूरमध्ये (Solapur) होणारा ‘लाडकी बहीण’ योजनेचा (Ladki Bahin Yojana) कार्यक्रम उधळवून लावण्याचा इशारा सोलापूरच्या सकल मराठा (Maratha) समाजाने दिला आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोलापुरात पाय ठेऊ देणार नाही अशी धमकी सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी माध्यमाशी बोलतांना दिली.

२५ सप्टेंबर रोजी सोलापूरात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील हजेरी लावणार आहे. हा कार्यक्रम होण्यापूर्वीच सकल मराठा समाजाने त्याला तीव्र विरोध दर्शवला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सोलापूरमध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम होणार आहे. लाडकी बहीण योजनेचा हा कार्यक्रम उधळवून लावण्याचा इशारा सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी दिला आहे. ‘मनोज जरांगे पाटील हे सहाव्यांदा उपोषणाला बसले असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करून सरकार कार्यक्रम घेत असेल तर तो कार्यक्रम आम्ही उधळून लावू. आरक्षणाच्या ज्वलंत प्रश्नाकडे सरकार लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम घेत असेल तर हे योग्य नाही.’, असे मत माऊली पवार यांनी व्यक्त केले.

अन्य लेख

संबंधित लेख