मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मराठवाड्यामध्ये मागील काही दिवसांपासून होत असलेल्या अतीवृष्टीच्या (Heavy Rain) पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचं आवाहन राज्यसरकारकडे केली आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून हि विनंती केली आहे.
राज ठाकरे यांनी पोस्ट मध्ये म्हणालेत कि, “गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात झालेल्या पावसाने, तिथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं अमाप नुकसान झालं आहे. कित्येक पिकं अगदी काढणीला आलेली असताना वाहून गेली आहेत. डोळ्यासमोर उभं झालेलं पीक नष्ट होणं आणि ते देखील सणासुदीच्या तोंडावर, हे सहन करणं कठीण आहे. राज्यसरकारने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करून, जितक्या लवकर नुकसान भरपाईची रक्कम देता येईल ते पहावं. शेतकरी पण लाडका आहे हे दाखवून द्यावं.”
राज ठाकरेंनी पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही यामध्ये लक्ष घालण्याचं आवाहन केलय, “तसंच मराठवाड्यातील महाराष्ट्र सैनिकांनी देखील प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे झटपट होत आहेत ना, नसल्यास ते करायला लावून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल हे पहावं. यात अजून एक गोष्ट म्हणजे पावसाच्या पाण्याने जमीन ओली झालेली असते, आणि ती सुकायला वेळ लागतो, यामुळे लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वच जण आजारी पडतात. त्यामुळे ज्या घरांत पाणी शिरलं आहे अशा ठिकाणी प्लॅस्टिकच्या शीट्स पोहचतील किंवा जुने फ्लेक्स तरी पोहचतील हे बघावे ! किमान त्या निमित्ताने तरी पुढारी जनतेच्या घरात पोहोचतील आणि आजपर्यंत आपलं वाटोळ कोणी केलं तेही जनतेला समजेल !
तसेच, या सगळ्यात सरकारने पण मदतीचा हात आखडता अजिबात घेऊ नये, आणि सणासुदीच्या सुट्ट्या असल्या तरी हा कठीण प्रसांग आहे हे लक्षात घेऊन, प्रशासनाला कामाला लावून नुकसान भरपाई गणपतीच्या सणाच्या काळात मिळेल हे पहावं,” असं राज ठाकरे यांनी पोस्ट मध्ये म्हटलं आहे.
- नितेश राणे यांचे वक्तव्य चिथावणी देणाऱ्या पाकिस्तान आणि बांगलादेशची भाषा बोलणाऱ्या लोकांबाबत – बावनकुळे
- मराठा समाजाचा ‘लाडकी बहीण’ योजनेचा कार्यक्रम उधळवून लावण्याचा इशारा; शिंदे-फडणवीस-पवार यांना सोलापूरात पाय ठेवू देणार नाही
- Solapur: सोलापूर विमानतळासंदर्भात नवी दिल्ली इथं उच्चस्तरीय बैठक
- महाराष्ट्राच्या राजकिय खिचडीला उध्दव ठाकरे जबाबदार
- Bangladesh: लष्कराला दंडाधिकाऱ्यांचे अधिकार देण्याच्या निर्णयावर बांगलादेशी नॅशनलिस्ट पार्टीची चिंता