Saturday, February 15, 2025

मंत्री नितेश राणे यांनी केली ट्रॉम्बे जेट्टीची पाहणी

Share

मुंबई : मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्रॉम्बे येथील मच्छीमार जेट्टीची पाहणी करून कामांचा आढावा घेतला. यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याच्या मत्स्य व्यवसाय उपायुक्त शर्वरी रणदिवे, विभागीय अधिकारी तसेच सागरी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

ट्रॉम्बे जेट्टीच्या विस्तारीकरणासाठी ३०० मीटर लांबीची नवी जेट्टी उभारण्यात येणार आहे. यासोबतच जाळी विणण्यासाठी शेड, प्रसाधनगृह आणि स्वच्छता गृह बांधण्याचीही योजना आहे. या प्रकल्पासाठी ६० कोटी ७५ लाख रुपयांचा आराखडा तयार करून ‘नाबार्ड’कडे सादर करण्यात आला आहे. नाबार्डच्या अर्थसहाय्यातून ही जेट्टी उभारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मंत्री नितेश राणे यांनी या कामाचा सविस्तर आढावा घेतला.

अन्य लेख

संबंधित लेख