Friday, October 18, 2024

लाडकी बहिण योजनेचा अपप्रचार…राऊंतांची डोकेदुखी ठरणार…

Share

महाराष्ट्रातील आकर्षणाचा विषय असलेली आणि महिला भगिनींना आनंदाचा अनुभव देणारी लाडकी बहिण योजनेबाबत (Ladki Bahin Yojana) अपप्रचार करणाऱ्या राऊतांची (Sanjay Raut) डोकेदुखी वाढते आहे. ऐन विधानसभा निवडणुकीआधी शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena Udhhav Thakare gat) नेते, खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या आहेत. संजय राऊत यांच्याविरोधात मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

https://twitter.com/ChitraKWagh/status/1844262545713967565/photo/1

खोटी अफवा पसरवल्याबद्दल संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय. मध्य प्रदेशातील लाडकी बहिण योजना बंद पडल्याचा दावा राऊतांनी केला होता. त्यानंतर भोपाळमध्ये भाजप महिला मोर्चाने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर आता संजय राऊत विरोधात गुन्हा झाला आहे

या बद्दल समाजमाध्यमावर व्यक्त होताना चित्रा वाघ यांनी खालील प्रतिक्रिया दिली आहे.

“दररोज सकाळी उठल्या उठल्या खोटं बोलणाऱ्या आणि ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवणाऱ्या रडतरौताचं थोबाड अखेर मध्य प्रदेश महिला मोर्चाने फोडले आहे.

‘खोटं बोल, पण रेटून बोल’ हे ब्रीदवाक्य दररोज सकाळी न चुकता सांभाळणाऱ्या रडतरौता वर भोपाळ मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. त्याची चौकशी होईलच.

दररोज सकाळी उठून ‘महायुती’ वर बिनबुडाचे आरोप करणारा हा सर्वज्ञानी पुरावे मात्र कधीही देत नाही. वास्तविक, त्याने एखादा आरोप केला की लगेच त्याला ताब्यात घ्यावे आणि पुरावे मागावेत ही जुनीच मागणी मी पुन्हा एकदा करते.”

“भोपाळमध्ये दाखल झालेल्या तक्रारीमुळे ‘दूध का दूध पानी का पानी’ सिद्ध होईलच, आणि या वाचाळवीराला चाप बसेल, अशी आशा मनाशी बाळगू या.” असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

मी काय चुकीचे बोललो आहे? जेव्हा आम्हाला कोर्टात बोलतील. तेव्हा आम्ही सांगू… उत्तर प्रदेशमध्ये खरोखर ‘लाडली बहन’ची काय स्थिती आहे की त्यांनी जाहीर केली पाहिजे. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे

अन्य लेख

संबंधित लेख