देशभरात गणेशोत्सव उत्साहात पार पडला , वर्धा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात काँग्रेस पक्षावर टीका केली आहे या कार्यक्रमात मोदींनी काँग्रेसला “गणपती पूजेचा विरोध करणारा” असे म्हटले आहे
मोदी म्हणाले, “काँग्रेस हा असा पक्ष आहे जो आपल्या संस्कृती, परंपरा आणि आस्थेला सतत त्रास देत आहे. आज पूर्ण देश गणपती बाप्पाच्या पूजेत मग्न आहे, पण काँग्रेस हा पक्ष त्याच विरोधात उभा आहे. हे केवळ त्यांच्या राजकीय स्वार्थांसाठी आहे.”
जिथे जिथे काँग्रेस चे सरकार आहे तिथे या गणेशउत्सवात विविध समस्यांना तोंड द्यावे लागले त्या मध्ये कर्नाटक येथे झालेला गणपती मिरवणुकीवर हल्ला. त्याच बरोबर गणपती बाप्पांच्या मूर्तीला पोलीस व्हॅन मध्ये टाकणे. अनेकांनी मोदींच्या विधानाला पाठिंबा देताना दिसत आहेत.
विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा शुक्रवारी येथील स्वावलंबी मैदानावर पार पडला. या कार्यक्रमात सहभागी लाभार्थ्यींना मार्गदर्शन करताना तसेच विविध योजनांचा शुभारंभ करताना पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी राज्यपाल डॉ. सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री जितनराम मांझी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.