Monday, October 7, 2024

खासदार निलेश लंके कुख्यात गुंड गजा मारणेच्या भेटीला; सत्कारही स्वीकारला

Share

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदार संघातील नवनिर्वाचीत खासदार आणि शरद पवार गटाचे नेते निलेश लंके (Nilesh Lanke) सध्या पुणे दौऱ्यावर आहे. दरम्यान निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारणेच्या (Gaja Marne) निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यानंतर निलेश लंके यांनी त्याच्याकडून सत्कारही स्वीकारला आहे. त्यांचा भेटीचा व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

कुख्यात गुंड गजानन मारणे उर्फ गजा मारणेचं मुळ गाव मुळशी तालुक्यात आहे. गजा मारणे हा मारणे टोळीचा म्होरक्या आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. गजा मारणेवर खुनाचा गुन्हा दाखल आहे. खून प्रकरणामध्ये गजा मारणे याला अटक झाली होती. खून प्रकरणात न्यायालयाने त्याला शिक्षाही दिली होती. त्यानंतर गजा मारणे तीन वर्ष पुण्यातील येरवडा कारगृहात होता.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांनी चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपाच्या सुजय विखे यांना पराभूत केले होते. या निवडणुकीत निलेश लंके यांना 6 लाख 24 हजार 797 मते मिळाली. सुजय विखे यांना 5 लाख 95 हजार 868 मते मिळाली होती.

खासदार निलेश लंके आणि कुख्यात गुंड गजा मारणे यांच्या भेटीबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या भेटीवर शरद पवार अथवा तुतारी गटाकडून कोण काही बोलत का? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख