Thursday, October 10, 2024

Mumbai: मुंबईतील वाहतूक कोंडीवर तोडगा : ५८ हजार कोटींच्या रिंगरोड प्रकल्पाला मंजुरी

Share

मुंबईतील (Mumbai) वाढत्या वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी मुंबई (Mumbai) महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ५८,००० कोटी रुपयांच्या रिंगरोड प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.

मुंबईत(Mumbai) वाहनांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढत असून प्रशासनाने रस्ते, पूल, बोगदे आणि इतर पायाभूत सुविधा वाढवून काही प्रमाणात ही समस्या कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. एमएमआरडीएने बाह्य आणि अंतर्गत अशा ७ रिंगरोड तयार करण्याचे नियोजन केले आहे. या रिंगरोड्समुळे शहरातील प्रमुख भाग एकमेकांशी जोडले जातील आणि उपनगरांशी कनेक्टिव्हिटी वाढेल.

प्रकल्पाच्या माध्यमातून १०० किमीच्या आसपास लांबीचे रस्ते, पूल आणि बोगदे बांधले जातील, ते मुंबईला (Mumbai) बाहेरील भागांशी जोडतील. काही रस्त्यांवर टोल आकारला जाईल. हे प्रकल्प विविध टप्प्यांवर सुरू असून, लवकरच त्याचे काम सुरू होणार आहे.

या प्रकल्पामुळे मुंबईतील (Mumbai) पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा होईल आणि शहराच्या वाहतुकीचे जाळे अधिक सुव्यवस्थित होईल. या प्रकल्पामुळे मुंबईतील (Mumbai) वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल आणि मुंबईकरांना वेगवान आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळेल.

अन्य लेख

संबंधित लेख