Thursday, October 10, 2024

नायर रुग्णालयातील लैंगिक छळप्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंची तातडीची कारवाई; डीनची बदली, विशेष समितीची स्थापना

Share

मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातील (Nair Hospital, Mumbai) लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले असून पीडितांना न्याय मिळवून देण्याची खात्री दिली आहे. “आरोग्य क्षेत्रातील अशा घटना अत्यंत गंभीर आहेत. आम्ही या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कडक कारवाई करू. रुग्णालयातील सर्वांसाठी एक सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे आमचे कर्तव्य आहे.” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ‘एक्स’ वर पोस्ट केली आहे, “काल नायर वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना भेटलो.सगळे जण प्रचंड दहशती खाली आहेत.नायर ची वाटचाल कोलकात्ताच्या दिशेने होत आहे.महापालिका प्रशासनाने हे संवेदनशील पणे हाताळले पाहिजे.नंतर कपाळाला हात लावून उपयोग नाही.” असं ते म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांना रुग्णालयाच्या डीनची तात्काळ बदली करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात येणार आहे. रुग्णालयातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना राबवण्यात येतील, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख