Sunday, October 13, 2024

राज्यात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत अयोध्येसाठीपहिली रेल्वे नांदेडमधून धावणार

Share

अर्ज करण्यासाठी ३० सप्टेंबर अंतिम तारीख

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी, अर्थात ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक आहे. अशा व्यक्तीसाठी राज्य
शासनाने भारतातील तीर्थक्षेत्रांची यात्रा करण्याची संधी उपलब्ध केली आहे. “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन”
योजनेअंतर्गत महाराष्ट्रातून पहिली रेल्वे अयोध्या दर्शनासाठी धावणार आहे. ही रेल्वे नांदेडहून २० ते
२२ सप्टेंबरपर्यंत निघण्याची शक्यता असून यासाठी आवश्यक ती सर्व तयारी प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह विशेष समाजकल्याण विभागाचे
सहायक आयुक्त एस. के. मिनगिरे यांनी दिली. या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत ७०० अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी २०० अर्ज पात्र ठरले आहेत. यातील १०० ज्येष्ठांनी अयोध्या दर्शनाचा पर्याय निवडला आहे तर ७० हून अधिक ज्येष्ठ तिरुपती बालाजी दर्शनासाठी इच्छुक आहेत. अयोध्यासमवेत नांदेडहून अमृतसर येथील सुवर्णमंदिर दर्शनासाठीही तयारी केली जात आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत ३० हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. योजनेअंतर्गत ज्येष्ठांना विविध आवश्यक साहित्य खरेदीसाठी तीन हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.

अन्य लेख

संबंधित लेख