Saturday, July 27, 2024

…नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर १५ दिवसांत उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर दिसतील

Share

महाराष्ट्र : देशात लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. १९ एप्रिल पासून सुरु झालेले मतदान १ जुन रोजी सातही टप्यातील मतदान पार पडले.आता ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्याआधी १ जून रोजी एक्झिट पोलचा (Exit Polls) अंदाज समोर आला आहे. भाजपाप्रणित (BJP) एनडीएने ३५० चा आकडा पार केल्याचं एक्झिट पोलच्या आकडेवारीत दिसत आहे. तर, देशात इंडिया आघाडीचं सरकार येणार असल्याचा दावा विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी केला आहे. यावर आता राज्यातील नेते आपली प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, ‘देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर १५ दिवसांत उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर दिसतील’, असा मोठा दावा अमरावतीचे (Amravati) आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केला आहे.

“मी आपल्याला सांगतो की, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलले आहेत. मात्र, आता मी जबाबदारीने सांगतो की, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान म्हणून विराजमान झाल्यानंतर १५ दिवसांमध्ये उद्धव ठाकरे हे मोदी सरकारमध्ये असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर ते दिसतील. कारण येणारा काळ हा नरेंद्र मोदी यांचा आहे. देशाचं भविष्य उज्वल करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गरज आहे”, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी जी खिडकी उघडून ठेवली आहे. त्या खिडकीतून निकालाच्या वीस दिवसानंतर उद्धव ठाकरे हे मोदी यांच्या सोबत महायुतीत जातील, असा दावाही रवी राणा यांनी केला.

रवी राणा म्हणाले, विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही नवनीत राणांचे काम केले आहे. दोन लाखांपेक्षा जास्त मतांनी नवनीत राणा या निवडून येतील असा विश्वास व्यक्त करत अहकांरी नेत्याच्या अहंकाराचा चुराडा जनता करणार आहे. जनता त्यांना धडा शिकवणार आहे. अहंकारी नेत्याचा अहंकार दाबण्याचं काम जनतेने केलं असल्याचेही यावेळी ते म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख