अमरावती : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी २६ सप्टेंबर २०२४ रोजी अमरावती (Amravati) दौरा केला. यावेळी इच्छामनी हॉस्पिटल येथे डॉ. अनुभुती पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. या दौऱ्यात नरेंद्र पाटील यांनी महामंडळाचे विविध मुद्दे मांडले. तसेच यायला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची मराठा आरक्षण व सारथी संदर्भातील असलेली भूमिका स्पष्ट केली. यानंतर प्रश्नोत्तर सत्र झाले आणि पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रमही पार पडला.
यानंतर विविध पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी निर्मल वारी अभियान: पथदर्शी सेवेची दशकपूर्ती, विकसित महाराष्ट्र, एकगठ्ठा मतदानाचा धडा, नवे फौजदारी कायदे!, बदलती मुंबई आणि उद्याची आव्हाने, वक्फ बोर्ड या पुस्तकाचे प्रकाशन पूर्णकारण्यात आले. या पुस्तक प्रकाशनातून समाजातील विविध मुद्द्यांवर चर्चा आणि विचारमंथन झाले. संपूर्ण कार्यक्रमात स्वानंद कोंडोलीकर, ईशान गीड आणि नितीन राजवैद्यही या कार्यक्रमास उपस्थित होते.