Tuesday, September 17, 2024

राजकोट मध्ये लवकरच नव्याने शिवपुतळा उभारणार

Share

राजकोट इथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्यानंतर तिथे नवा पुतळा उभारणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ते नांदगाव येथे शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करताना बोलते होते.

छत्रपती शिवाजी महाराज युग पुरूष आहेत. ते राज्याची अस्मीता आहेत. राजकोट  येथील दुर्घटना दुर्दैवी असून लवकरच तेथे राज्यशासन आणि नौदलाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे भव्य शिवसृष्टी उभारण्यात आली आहे. आमदार सुहास कांदे यांच्या पुढाकाराने तसेच प्रादेशिक पर्यटन विकास योजना तसेच सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना यांच्या माध्यमातून एक हेक्टर क्षेत्रावर ही शिवसृष्टी उभारण्यात आली असून त्याचा लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार किशोर दराडे,आमदार सुहास कांदे आदी उपस्थित होते. नांदगावच्या शिवसृष्टीचा उपक्रम अत्यंत चांगला असून त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून दिला जाईल तसेच नांदगाव नगरपालिकेच्या इमारतीसाठी १० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल असेही त्यांनी सांगितले.

अन्य लेख

संबंधित लेख