Sunday, October 13, 2024

नितेश राणे यांचे वक्तव्य चिथावणी देणाऱ्या पाकिस्तान आणि बांगलादेशची भाषा बोलणाऱ्या लोकांबाबत – बावनकुळे

Share

नागपूर : भारतीय जनता पक्षाचे (bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुस्लिम समाजाच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. बावनकुळे म्हणाले कि, नितेश राणे यांनी स्पष्ट केले आहे की त्यांचे वक्तव्य देशाच्या मुस्लिम समाजाबद्दल नाही. महाराष्ट्र राहणाऱ्या मुस्लिम समाजाबद्दल नाही. त्यांचा वक्तव्य चिथावणी देणाऱ्या पाकिस्तान आणि बांगलादेशची भाषा बोलणाऱ्या लोकांबाबत आहे. काही लोक महाराष्ट्रात दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्या रिल्स समाज माध्यमांवर फिरवल्या जात आहे. याला काही लोकांचं पाठबळ आहे त्याची चौकशी केली पाहिजे, असे नितेश राणे यांचे म्हणणे आहे, याच्यात काही वाद निर्माण करण्याचा काही कारण नसल्याचं बावनकुळे म्हणाले आहेत. ते नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधत होते.

अन्य लेख

संबंधित लेख