मुंबई : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ (Olympic Games Paris 2024) मध्ये भारतीय चमुसाठी पदकाचे खाते उघडून नेमबाज मनु भाकरने (Manu Bhaker) एक चांगली सुरुवात केली आहे. यातून भारतीय खेळाडू प्रेरणा घेतील आणि देशासाठी पदकांची लयलूट करतील असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मनु भाकरचे अभिनंदन केले आहे.
महिला नेमबाज मनु भाकरने १० मीटर एअर पिस्तुल नेमबाजीमध्ये कांस्य पदक पटकावून या स्पर्धेतील भारतासाठी पहिले पदक मिळवले आहे. नेमबाज मनु भाकरची ही कामगिरी तमाम देशवासियांसाठी सार्थ अभिमानाची असल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तिला स्पर्धेसाठी तसेच नेमबाजीतील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
- एआय चर्चेपुरते नको, बांधापर्यंत पोहोचवा!” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले ‘महाॲग्री एआय’ मॉडेल
- एआय समिटच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी मॉरिशसच्या पंतप्रधानांशी भेट; ‘एआय’ आणि सागरी सुरक्षेवर दिला भर
- मिशन वर्ल्डकप : भारताचा ‘सुपर ८’ मध्ये प्रवेश; पहिल्याच लढतीत दक्षिण आफ्रिकेचे तगडे आव्हान!
- भाजपच्या संघटन बांधणीला मिळणार नवी गती! महाराष्ट्रात ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियाना’चा दिमाखदार शुभारंभ
- चायना कटिंग कराचीचा सरकारी लँड जिहाद