मुंबई : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ (Olympic Games Paris 2024) मध्ये भारतीय चमुसाठी पदकाचे खाते उघडून नेमबाज मनु भाकरने (Manu Bhaker) एक चांगली सुरुवात केली आहे. यातून भारतीय खेळाडू प्रेरणा घेतील आणि देशासाठी पदकांची लयलूट करतील असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मनु भाकरचे अभिनंदन केले आहे.
महिला नेमबाज मनु भाकरने १० मीटर एअर पिस्तुल नेमबाजीमध्ये कांस्य पदक पटकावून या स्पर्धेतील भारतासाठी पहिले पदक मिळवले आहे. नेमबाज मनु भाकरची ही कामगिरी तमाम देशवासियांसाठी सार्थ अभिमानाची असल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तिला स्पर्धेसाठी तसेच नेमबाजीतील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
- मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
- प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्यासाठी धोरणात्मक निर्णय लवकरच – फलोत्पादन मंत्री भरत गोगावले
- शक्तीपीठ महामार्ग: श्रद्धा, शक्ती आणि समृद्धीचा “गेम चेंजर”
- या पक्षामध्येही ‘शिंदे-ठाकरे’ पॅटर्नची पुनरावृत्ती? या आमदाराने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवली!
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन!