Wednesday, December 4, 2024

“भारताचा बांगलादेश होऊ द्यायचा नसेल तर 20 नोव्हेंबर लक्षात ठेवा” – स्वामी गोविंददेव गिरी महाराजांचा पाथर्डीतून संदेश

Share

पाथर्डी : श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष आणि श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टचे उपाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज (Swami Govind Dev Giri Maharaj) ४ नोव्हेंबर रोजी पाथर्डी (Pathardi) येथे आले होते. त्यांच्या आगमनानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यांनी “भारताचा बांगलादेश होऊ द्यायचा नसेल तर 20 नोव्हेंबर लक्षात ठेवा. आपल्या पुढील पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे,” असा प्रेरणादायी संदेश दिला.

सोमवार, 4 नोव्हेंबर रोजी पाथर्डीमध्ये शिवचैतन्य जागरण यात्रेचे (Shiv Chaitanya Jagran Yatra) स्वागत करण्यात आले. दुपारी १२ वाजता अर्जुना लॉन्सपासून सुरू झालेल्या या भव्य मोटारसायकल मिरवणुकीत ४०० ते ४५० मोटारसायकली सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर, दुपारी १ वाजता अजिंठा चौकात सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये ५,००० लोकांची उपस्थिती होती.

अन्य लेख

संबंधित लेख