Tuesday, December 3, 2024

आज मिळणार नमो किसान चे २००० रुपये

Share

शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारनं विविध योजना सुरु केल्या आहेत. यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana). या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. प्रत्येक चार महिन्यांच्या फरकाने शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होतो.

राज्यात नुकतेच लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते एकाचवेळी जमा करण्यात आले आहेत त्यांतर आता शेतकऱ्यांसाठीही मोठी खुशखबर आहे. ती म्हणजे नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे. पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आज जमा होणार आहे. त्यामुळे राज्यातल्या एकाच घरात आज एकूण 5000 हजार रुपये मिळणार आहेत. परळी येथे कृषी महोत्सवामध्ये केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या हस्ते हे पैसे वितरित करण्यात येणार असून त्याचा फायदा देशातील एक कोटी शेतकऱ्यांना होणार आहे.

योजनेशी संबंधित अपडेटसाठी किसन भाई अधिकृत साइट pmkisan.gov.in ची मदत घेऊ शकतात. शेतकरी बांधवही जवळच्या CSC केंद्रावर जाऊन ई-केवायसी करू शकतात. शेतकरी बांधवांना काही अडचण येत असेल तर ते हेल्पलाइन क्रमांक 155261 ची मदत घेऊ शकतात. योजनेशी संबंधित तपशील जाणून घेण्यासाठी शेतकरी बांधव 1800115526 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

अन्य लेख

संबंधित लेख