Saturday, September 7, 2024

तिसऱ्या चरणच्या मतदानाने ४ जूनला इंडी आघाडीची एक्सपायरी तारीख निश्चित केली

Share

PM Narendra Modi : महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता जोर धरू लागला आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी महाराष्ट्रातील 11 जागांवर मतदान होणार असून त्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची आज अहमदनगर येथे महायुतीचे अहमदनगरचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) व शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांच्या प्रचारार्थ सभा होत आहे.

श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र ज्यांनी दिला त्या साईबाबांच्या चरणी नतमस्तक होतो. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनाही कोटी कोटी अभिवादन करतो. असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदनगर जिल्ह्यातील प्रचार सभेला मराठीतून सुरुवात केली. यावेळी बोलतांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, “आज तिसऱ्या चरणात मतदान होत आहे, सगळीकडे भाजपा आणि एनडीए ला भरपूर जनसमर्थन मिळत आहे. तिसऱ्या चरणच्या मतदानाने ४ जूनला इंडी आघाडीची एक्सपायरी तारीख निश्चित केली आहे. ४ जून नंतर इंडी वाल्यांचा झेंडा उचलणारा पण कोणी मिळणार नाही’ असं ते म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख