Saturday, July 27, 2024

हा पूर्णपणे मुस्लिम लीगचा जाहीरनामा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Share

PM Narendra Modi : महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता जोर धरू लागला आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी महाराष्ट्रातील 11 जागांवर मतदान होणार असून त्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची आज अहमदनगर येथे महायुतीचे अहमदनगरचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) व शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांच्या प्रचारार्थ सभा होत आहे.

दरम्यान, काँग्रेस पक्षाने जाहीर केलेला जाहीरनामा हा पूर्णपणे मुस्लिम लीगचा जाहीरनामा असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. भारतीय जनता पक्ष आणि एनडीएतील घटक पक्षातील जाहीरनाम्यात विकास, गरीब कल्याण, राष्ट्रीय सुरक्षा, देशाचा स्वाभिमान, देशाचा सन्मान हे सर्व एनडीएच्या जाहीरनाम्यातील मुद्दे असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यातील एकाही मुद्द्यावर काँग्रेस बोलत नसल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी केला आहे.

अन्य लेख

संबंधित लेख