Saturday, May 25, 2024

मोदींचे परभणीकरांना आवाहन : माझ्या लहान भावाला महादेव जानकरांना संसदेत पाठवा

Share

परभणी : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी महाराष्ट्रात १९ एप्रिल रोजी मतदान पार पडले. आता पुढच्या टप्प्यासाठी २६ एप्रिल रोजी नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम अशा ८ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यापैकी नांदेड (Nanded) आणि परभणीत (Parbhani) आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) प्रचारसभा पार पडल्या. या सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीमधून (Marathi) केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परभणी लोकसभा मतदारसंघात प्रथमच प्रचारसभा झाली. या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर (Mahadev Jankar) हे मैदानात आहेत. त्यामुळे, परभणी लोकसभेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. परभणीतील सभेत मोदींनी महादेव जानकर यांचा लहान भाऊ म्हणून उल्लेख केला. माझा लहान भाऊ महादेव जानकर, त्याला संसदेत पाठवा, असे आवाहन मोदींनी केले. मोदींनी लहान भाऊ म्हणताच महादेव जानकर यांनी आपल्या जागेवरून उठून हात जोडून सर्वांना अभिवादन केले. तसेच, मोदींनी भर मंचावर जानकरांना शिट्टी दिली. त्यावेळी, आनंदाच्या भरात जानकरांनी जोरजोराने शिट्टी वाजवली. 

अन्य लेख

संबंधित लेख