Saturday, May 25, 2024

“बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाले पण, सगळ्यात जास्त राग नकली शिवसेनेला” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Share

नाशिक : जय शिवाजी असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. सप्तश्रृंगी मातेला आणि नाशिकच्या प्रभू रामचंद्राला आपण नमन करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. गेल्या दहा वर्षात तुम्ही माझे काम पाहिले आहे. आता मी तुमच्याकडे तिसऱ्या कार्यकाळासाठी आणि विकसित भारतासाठी आर्शीवाद मागण्यासाठी आलो असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. तुमची सेवा हेच माझे सर्वात मोठे लक्ष असल्याचेही मोदींनी यावेळी म्हटले आहे. दिंडोरी मतदार संघातील उमेदवार डॉ. भारती पवार (Dr.Bharati Pawar) आणि नाशिक लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते या वेळी ते बोलत होते.

दरम्यान, “नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काँग्रेसमध्ये विलीनीकरण हे नक्की आहे. मात्र ज्या दिवशी नकली शिवसेनेचे विलीनीकरण हे काँग्रेसमध्ये होईल, त्या दिवशी मला सर्वात जास्त बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येईल. ज्या दिवशी काँग्रेसमध्ये शिवसेना विलीन होईल, त्या दिवशी मी माझ्या दुकानाचे शटर खाली घेईल, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते”, असं ते म्हणाले. 

अयोध्या मध्ये प्रभू रामचंद्रांचे मंदिर करणे, जम्मू-काश्मीर मधून कलम 370 काढून टाकावे हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण झाले. मात्र, यामुळे सगळ्यात जास्त राग नकली शिवसेनेला येत असल्याची टीका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उबाठा गटाला लावला.

काँग्रेसने प्राण प्रतिष्ठानच्या निमंत्रणाला नाकारलं. तर नकली शिवसेनेने देखील तोच मार्ग अवलंबला. काँग्रेसचे नेते राम मंदिराबद्दल उलटसुलट बोलत आहेत. मात्र, नकली शिवसेना यावर काहीही बोलत नसल्याचे देखील नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख