PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून देशभर वेगवेगळ्या पक्षांचे नेते आणि उमेदवार त्यांचा प्रचार करत आहेत. महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता जोर धरू लागला आहे. “काँग्रेस (Congress) केवळ तुष्टीकरणासाठी वारंवार प्रभू श्रीरामाचा आणि राम भक्तांचा अपमान करत असल्याचा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल अंबाजोगाई (Ambajogai) येथे बीड लोकसभा (Beed Lok Sabha) मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते.
“एका काँग्रेस नेत्याने ज्याने काही दिवसा पूर्वी काँग्रेस सोडली. त्यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. ज्यावेळी, सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिरच्या बाजूने निर्णय दिला होता, तो निर्णय आल्यानंतर राहुल गांधी यांनी महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला काँग्रेस सरकार आल्यास बदलणार असल्याची घोषणा राहुल गांधी यांनी केली होती. राजीव गांधी यांनी देखील तुष्टीकरणासाठी तीन तलाक च्या मुद्यावर शाहबानो प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बदलला होता. त्यामुळे काँग्रेस राम मंदिराचा निर्णय देखील बदलणार असल्याची भाषा करत आहे.”
दरम्यान, राम मंदिर बिनकामाचे असल्याचे इंडी गटबंधनच्या एका मोठ्या नेत्याने सांगितले होते. त्याच नेत्याने भगवान रामाच्या पूजेला पाखंड असल्याचे म्हटले होते. मात्र, इतर धर्मासाठी अशी भाषा बोलण्याची त्यांची हिंमत स्वप्नात सुद्धा होत नसल्याचे मोदी म्हणाले. काँग्रेस केवळ तुष्टीकरणासाठी वारंवार प्रभू श्रीरामाचा आणि राम भक्तांचा अपमान करत असल्याचा आरोप नरेंद्र मोदी यांनी केलाआहे.