पुणे : पुण्यातील (Pune) कल्याणीनगर येथे एका बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत कार चालवून बाईकला धडक दिली आणि त्यामध्ये दोघांना जीव गमवावा लागला. या घटनेमुळे पुण्यातीलच नव्हे देशभरातील नागरिकांनी व्यक्त करत दोषीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी राजकारण चांगलंच तापलं असून आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगले आहे. यातच आता भाजप (BJP) नेते नितेश राणेंनी (Nitesh Rane) याप्रकरणात उडी घेत थेट राष्ट्रवादीच्या नेत्या, सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर निशाणा साधत टीका केली.
देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) कायम राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळे गप्प का? त्यांचा अग्रवाल कुटुंबाशी संबंध आहे का? असा सवाल उपस्थित करत भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप केला आहे.
नितेश राणे म्हणाले, नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे या पुणे अपघातावर गप्प का आहेत? असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे. शरद पवार गटातून या घटनेवर प्रतिक्रिया का येत नाही ? अग्ररवाल आणि त्यांच्या कुटुंबाचे काही संबंध आहेत का? आरोपीचे वकील हे शरद पवार यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. असा आरोप नितेश राणे यांनी केला. देवेंद्र फडणीसांनी आयुक्तालयात बसून अतिशय स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्या मुलावर कडक कारवाई सुरू आहे. आता सुप्रियाताईंनी त्या गप्प का आहेत ते आम्हाला सांगावे. त्यानंतर खूप रहस्य बाहेर येतील.