Sunday, November 24, 2024

विविध पक्षांतील प्रमुख उमेदवार बंडखोरांच्या दारी जाऊन त्यांची मनधरणी करणार

Share

विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघांतून जवळपास 400 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी मागे घेण्यासाठी सोमवारी एकच दिवस आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तीन दिवसांत विविध पक्षांतील प्रमुख उमेदवारांना बंडखोरांच्या दारी जाऊन त्यांची मनधरणी करावी लागणार आहे.

महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समित्यांच्या निवडणुका न झाल्याने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे काँग्रेस, भाजप, ठाकरे शिवसेना, शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांकडून उमेदवारी अर्ज भरलेल्या नेत्यांची कोंडी झाली.दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका, जिल्हा परिषद, बाजार समित्यांच्या निवडणुका होणार आहेत.

त्यामुळे विविध पक्षांतील प्रमुख उमेदवारांकडून अपक्ष अर्ज भरलेल्या महत्त्वाच्या नेत्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर, सभापती, नगरसेवक करतो म्हणून आश्वासन देऊन उमेदवारी मागे घेण्यासाठी काही नेते प्रयत्न करत आहेत. मात्र अपक्ष उमेदवारी भरणार्‍या नेत्यांची संख्या मोठी असल्याने ऐन दिवाळी त्यांच्या मागे पळावे लागणार आहे.

अन्य लेख

संबंधित लेख