Monday, June 24, 2024

“अहो थोडी तर लाज वाटू द्या, कारण..,” अनिल देशमुखांना भाजप नेत्याचं उत्तर

Share

Pune Porsche Car Accident : पुण्यात कल्याणीनगर इथं शनिवारी रात्री झालेल्या वाहन अपघात प्रकरण (Porsche Car Accident) सध्या चांगलेच चर्चेत आहे. कल्याणी नगर जंक्शन भागात रविवारी पहाटे नंबरप्लेट नसलेल्या पोर्श कारने मोटारसायकलला धडक दिली होती. या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला होता. आता याप्रकरणी राजकीय आरोप प्रत्यारोपाने चांगलच वातावरण तापलं आहे.

दरम्यान, याप्रकरणी अनिल देशमुख यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांना खडेबोल सुनावल “देवेंद्रजी काही दिवसांपूर्वीच तुम्ही म्हणाला होतात गाडीखाली कुत्रा आला तरी विरोधक राजीनामा मागतील… आज गरिबा घरची दोन लेकरं धनदांडग्याच्या गाडी खाली चिरडली अन् तुमच्या व्यवस्थेने हे दोन जीव घेणाऱ्या हैवानाला पिझ्झा बर्गर खाऊ घातले, दहा तासात जामीन करून दिला (तो पण रविवारी). देवेंद्रजी, आता तुम्हीच सांगा आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागायचा❓” असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी उपस्थित केला आहे.

अनिल देशमुख यांच्या प्रश्नाला भाजप (BJP) नेते राम कदम (Ram Kadam) यांनी जोरदार उत्तर दिलंय. राम कदम यांनी सोशअल मीडिया वर ट्विट करत संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “अहो थोडी तर लाज वाटू द्या, कारण, एकतर देवेंद्र फडणवीसजी घरी बसून राहिले नाहीत . थेट पुणे आयुक्तालयात गेले आणि कारवाईला गती दिली. तुमच्या माहितीसाठी आता प्रौढ आरोपी म्हणून त्याच्यावर खटला चालणार आहे. तुम्हाला तर राजीनामा मागण्याचा अधिकारच नाही. कारण 100 कोटींची वसुली करायला केवळ एकच मुख्यमंत्री अन गृहमंत्री या राज्याला लाभला, ते कोण हे आम्ही सांगण्याची गरज नाही. एका धन दांडग्या बिल्डर आरोपीला पिकनिकसाठी पुण्यात जायला कोविड काळात पोलिस ताफा कुणी दिला, हे जरा आठवून पहा. म्हणजे तुम्हाला पुढचे काही बोलण्याची हिंमतच होणार नाही आता बसली की नाही दातखिळी”, असे राम कदम यांनी म्हटले आहे.

 

अन्य लेख

संबंधित लेख