Saturday, July 27, 2024

उधोजीराव, या १० प्रश्नांची उत्तरे द्या !

Share

प्रिय उधोजीराव,

१) बिकेसी मैदानावर इंडि आघाडीच्या सभेत सर्व पक्ष आपापल्या पक्षांचे झेंडे घेऊन आले होते. तथापि, भगवा ध्वज मात्र या सभेतून गायब झाला होता. भगव्या ध्वजाचे आपणास कशामुळे विस्मरण झाले?

२) बिकेसी मैदानावरील सभेत ‘जय भवानी जय शिवाजी’ ही प्राणप्रिय घोषणा ऐकू आली नाही, याचे कारण काय?

३) बिकेसी मैदानावर आपले प्रथेप्रमाणे शेवटचे भाषण झाले नाही. सभेच्या प्रारंभीच आपल्याला भाषण करायला सांगितले. आपल्या नंतर अन्य भाषणे झाली. हा मातोश्रीचा अपमान नाही का? राजकीय सोयीसाठी आपण स्वाभिमान गहाण ठेवला, असे मराठी जनतेने मानायचे का?

४)  मराठी माणसाच्या रोजगारासाठी आपण झगडत असल्याचे सांगता. आपले रोजगारचे साधन काय? मातोश्री २ या भव्य, अलीशान आणि पंचतारांकित इमारतीसाठी आपण पैसे कुठून आणले?

५) बहुसंख्य ठाकरे परिवार सदस्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. याचे कारण काय? आपले वर्तन त्यांना मान्य नाही का? या कौटुंबिक कलहाचे कारण काय?

६)  मराठी माणसाला आपण एकजुटीचे आवाहन करता. परंतु, आपल्याला आपले कुटुंब आणि पक्ष एकत्र ठेवता आला नाही. ही आपली शोकांतिका नाही का?

७) मातोश्रीमधील `kitchen cabinet’ या आरोपात किती तथ्य आहे?

८) आपल्या पक्षाच्या खंडणीखोरीमुळे राज्यात उद्योग आणि गुंतवणूक येत नसल्याचा जुना आरोप आहे. याचा आपण कसा खुलासा कराल?

९)  वैचारिक दारिद्रयामुळे आपण आपला पक्ष डाव्या मंडळींकडे गहाण ठेवला आहे का?

१०) शेवटी, बिकेसी मैदानावरील सभेत बाळासाहेबांचा फोटो गायब होता. आपणास आपल्या पित्याचे विस्मरण झाले का? आपल्या पित्याचे स्मरण केवळ मुख्यमंत्री होण्यासाठीच झाले का? 

अन्य लेख

संबंधित लेख