Sunday, October 13, 2024

Rahul Gandhi: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल

Share

राहुल गांधींवरील (Rahul Gandhi)अवमानजनक टिप्पणीचे प्रकरण

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासंदर्भात कथित अवमानजनक टिप्पणी केल्याप्रकरणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांच्या विरोधात कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल गांधींनी (Rahul Gandhi)अमेरिका दौऱ्यात शीक धर्मियांबाबत संभ्रम निर्माण करणारे विधान केले होते. त्यामुळे रवनीत सिंग बिट्टू यांनी राहुल यांना उद्देशून कथित आक्षेपार्ह विधान केले होते. याप्रकरणी काँग्रेस
कार्यकर्त्यांनी बिट्टू यांच्या विरोधात बुधवारी देशभर आंदोलन केले. तसेच काँग्रेसशासित कर्नाटकात
केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कर्नाटकातील बेंगळुरू येथील हाय ग्राऊंड
पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेचे कलम 353, 192 आणि 196 अन्वये गुन्हा दाखल करण्यात
आलाय.

याप्रकरणी प्रतिक्रीया देताना रवनीत सिंग बिट्टू म्हणाले की, राहुल गांधी संदर्भातील वक्तव्याचा
अजिबात खेद वाटत नाही. आम्ही पंजाबमध्ये एक पिढी बरबाद होताना अनुभवली आहे. एक
शिखपंथीय म्हणून माझ्या मनात फार दुःख आहे. मी केंद्रीय मंत्री असण्यासोबतच एक शीख देखील
आहे. जर दहशतवादी पन्नू राहुल गांधींच्या विधानाचे समर्थन करीत असेल तर राहुल गांधींना काय
म्हंटले पाहिजे…? असा प्रश्नही बिट्टू यांनी उपस्थित केला आहे.

अन्य लेख

संबंधित लेख