Monday, January 6, 2025

राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी; जाणून घ्या विधानसभेच्या इतिहासातील आत्तापर्यंतचे अध्यक्ष

Share

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या (Maharashtra Legislative Assembly) अध्यक्षपदी भाजपचे नेते आणि आमदार राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांची पुन्हा एकदा एकमताने निवड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांच्या विधानसभा अध्यक्षपदासाठी प्रस्ताव सादर केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसेच चंद्रकांत पाटील यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झाल्याची घोषणा केली. यानंतर राहुल नार्वेकर यांची बिनविरोध विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झाली. निवडीनंतर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे आणि नाना पटोले यांच्या उपस्थितीत राहुल नार्वेकर यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात, विधानसभेचे अध्यक्षपद हे अत्यंत महत्त्वाचे आणि प्रतिष्ठित मानले जाते. विधानसभेच्या कामकाजात सुव्यवस्था राखणे आणि सभागृहाचे नियमन करणे हे या पदाचे प्रमुख कार्य असते. आजपर्यंत महाराष्ट्र विधानसभेने अनेक नामवंत व्यक्तींना हे पद भूषविले आहे. बाळासाहेब भारदे यांच्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा शपथ घेणारे महाराष्ट्रातील दुसरे अध्यक्ष म्हणून त्यांची नोंद केली जाणार आहे.

विधानसभेच्या आतापर्यंतच्या अध्यक्षांची यादी पाहूया :

अध्यक्षांचे नावपक्षकारकिर्दीचा कालावधी
सयाजी सिलमकाँग्रेस१ मे १९६० ते १२ मार्च १९६२
बाळासाहेब भारदेकाँग्रेस१७ मार्च १९६२ ते १३ मार्च १९६७
बाळासाहेब भारदेकाँग्रेस१५ मार्च १९६७ ते १५ मार्च १९७२
बॅ. शेषराव वानखेडेकाँग्रेस२२ मार्च १९७२ ते २० एप्रिल १९७७
बाळासाहेब देसाईकाँग्रेस४ जुलै १९७७ ते १३ मार्च १९७८
शिवराज पाटीलकाँग्रेस१७ मार्च १९७८ ते ६ डिसेंबर १९७९
प्राणलाल व्होराकाँग्रेस१ फेब्रुवारी १९८० ते २९ जून १९८०
शरद शंकर दिघेकाँग्रेस२ जुलै १९८० ते ११ जानेवारी १९८५
शंकरराव जगतापकाँग्रेस२० मार्च १९८५ ते १९ मार्च १९९०
मधुकरराव चौधरीकाँग्रेस२१ मार्च १९९० ते २२ मार्च १९९५
दत्ताजी नलावडेशिवसेना२४ मार्च १९९५ ते १९ ऑक्टोबर १९९९
अरुण गुजराथीराष्ट्रवादी२२ ऑक्टोबर १९९९ ते १७ ऑक्टोबर २००४
बाबासाहेब कुपेकरराष्ट्रवादी६ नोव्हेंबर २००४ ते ३ नोव्हेंबर २००९
दिलीप वळसे-पाटीलराष्ट्रवादी११ नोव्हेंबर २००९ ते ८ नोव्हेंबर २०१४
हरीभाऊ बागडेभाजप१२ नोव्हेंबर २०१४ ते २५ नोव्हेंबर २०१९
नाना पटोलेकाँग्रेस१ डिसेंबर २०१९ ते ४ फेब्रुवारी २०२१
राहुल नार्वेकरभाजप३ जुलै २०२२ ते २६ नोव्हेंबर २०२४

अन्य लेख

संबंधित लेख