Saturday, May 25, 2024

‘लाव रे तो व्हिडिओ” म्हणत राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरे वर घणाघात

Share

राज ठाकरे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर त्यांची काल ठाण्यात (Thane) सभा पार पडली. शिवसेनेचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची आज सभा पडली. या सभेत राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर सडकून टीका केली. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma andhare) यांचा ‘लाव रे तो व्हिडिओ’ दाखवत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘माझे वडील चोरले म्हणता मग बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या या बाईला पक्षाचे प्रवक्ते कसं केलं’, असा सवाल करत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका केली आहे.

राज ठाकरे यांनी यावेळी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा लाव रे तो व्हिडिओ दाखवत उद्धव ठाकरेंवर टीका केली. “माझे वडील चोरले म्हणता मग बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या या बाईला पक्षाचे प्रवक्ते कसं केलं. ८५-८५ वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातात तलवार दिल्यावर काय उपयोग होणार आहे?  हात थरथर करायला लागलेत असं म्हणणारी ही बाई तिला तुम्ही तुमच्या पक्षाचे प्रवक्ते करता आणि बाळासाहेबांवर प्रेम आहे म्हणून सांगता?”, असा घणाघात राज ठाकरे यांनी केला.

अन्य लेख

संबंधित लेख