Sunday, May 26, 2024

रक्षा खडसेंच्या विजयासाठी प्रयत्न करणार – एकनाथ खडसे

Share

जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील रावेर लोकसभा (Raver Lok Sabha) मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे (Raksha Khadse) आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. रक्षा खडसे यांचं तिकीट कापलं जाईल अशा चर्चा सुरु होत्या. मात्र, भारतीय जनता पक्षानं (BJP) पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवत तिसऱ्या वेळी उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रक्षा खडसे यांनी त्यांचे सासरे एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे आशीर्वाद घेतले आहेत. यावेळी एकनाथ खडसे यांनी रक्षा खडसेंच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं आहे.

रक्षा खडसे यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या श्रीराम पाटील (Shriram Patil) यांच्याशी होणार आहे. ‘रक्षा खडसे यांनी मागील काळात चांगले काम केलं आहे, त्यामुळेच पक्षाने विश्वास दाखवत तिसऱ्या वेळी उमेदवारी दिली आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले. भाजपा प्रवेशावर बोलतांना ते म्हणाले, आपण भावी आपण काळात भाजप मधे प्रवेश करणार आहोत. त्यामुळे रक्षा खडसे यांच्या विजयासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे.

अन्य लेख

संबंधित लेख