Friday, October 18, 2024

जागा वाटपावरून मविआ मधील तिढा वाढला !

Share

मुंबईतील जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये तिढा वाढल्याची बातमी समोर आली आहे. पक्षांनी 2019 जिंकलेल्या जागा व्यतिरिक्त इतर 16 जागांवरून हा वाद सुरू आहे यातील काही जागांवर तर तीनही पक्ष दावा करत आहेत त्यामुळे जागा वाटपा वरून महाविकास आघाडीतील तिढा वाढला आहे

शिवसेना उद्धव ठाकरे गट अजूनही 20 ते 22 जागांवर आग्रही आहे तर ह्याच काही जागांवर काँग्रेसही आग्रही आहे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबईतल्या पाच ते सात जागांवर आपला दावा करत आहेत. नुकतीच मुंबईत महाविकास आघाडीची आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटवा संदर्भात बैठक पार पडली.
काँग्रेसच्या मुंबईतील जागांचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ घेतील अशी माहिती काँग्रेस नेत्यांकडून देण्यात आली. त्यामुळे आता मुंबईतील जागांवर काँग्रेस आणि ठाकरे गटात मतभेद असल्याची माहिती समोर येत आहे.हा जागा वाटपाचा तिढा जर लवकर संपला नाही तर त्याचा फटका मविआ गटाला नक्कीच पडेल.

मविआ गटातील जागावाटपावरून वाद हे नवीन नाहीत मात्र या निवडणुकांमध्ये कोण किती जागांवर दावा करण्यात यशस्वी होईल हे बघण्यासारखा असेल.

अन्य लेख

संबंधित लेख