Friday, September 20, 2024

छ.संभाजीनगर येथे इ.व्ही.रामास्वामीचा वादग्रस्त पुतळा बेकायदेशीररित्या बसविन्यापासून रोखले

Share

छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज भागात महाराष्ट्र महाविद्यालय येथे इ. व्ही.रामास्वामी यांचा पुतळा बसविण्याचा कार्यक्रम दिनांक 01 सप्टेंबर 2024 रोजी बामसेफ, ब्रिगेड या संघटनांशी संबंधित निमंत्रक सुनील वाकेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जाहीर केले होते. या कार्यक्रमास स्थानिक नागरिक व विवेक विचार मंच ने विरोध केला. पोलिस आयुक्तांना निवेदन दिले की, कायदेशीर परवानगीशिवाय पुतळा बसविण्याची कृती ही पूर्णपणे बेकायदेशीर असल्याकारणाने तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. सदर पुतळा बसविण्यास आयोजकांनी कायदेशीर परवानगी घेतली नसल्याचे पोलिस तपासात निदर्शनास आले. शेवटी आयोजकांना पुतळा अनावरण रद्द करावे लागले.

इ. व्ही. रामास्वामी हे इतिहासातील अतिशय वादग्रस्त व्यक्तिमत्व असून, रामास्वामी यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय राज्यघटना जळण्याचे आंदोलन केले होते व त्यामुळे त्यांना नेहरू सरकारने अटक देखील केली होती. रामस्वामी यांनी तीव्र वंशद्वेष केला, भाषाद्वेष केला व जाती द्वेष करून वंशविच्छेद करण्याची भूमिका घेतली होती. हिंदू देवदेवतांच्या मूर्ती फोडण्याचे तसेच त्यांचा अवमान करण्याचे काम केले. महाविद्यालायत असा पुतळा बसवून नेमका कोणता आदर्श निर्माण करायचा आहे? या पुतळ्या ऐवजी आयोजकांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवायला पाहिजे.

आयोजक मंडळी बामसेफ, ब्रिगेड व विद्रोही संघटनेशी संबंधित आहे. हे लोक नेहमीच समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आले आहेत. पुरोगामी महाराष्ट्रातील महापुरुष सोडून यांना रामास्वामी चा पुतळा बसविण्याचा का पुळका का आला असेल? यांना असले स्टंट करून समाजात जातीय द्वेष निर्माण करायचा आहे हे लक्षात येते. राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाने अशा वादग्रस्त गोष्टींना परवानगी देऊ नये. बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई करावी.

— डॉ. निखिल आठवले.

अन्य लेख

संबंधित लेख