Saturday, October 12, 2024

संजय राऊतला लाज वाटली पाहिजे; प्रवीण दरेकरांची कडक प्रतिक्रिया

Share

महाराष्ट्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजप (BJP) नेते केंद्रीय गृहमंत्री मंत्री अमित शाह (Amit Shah) दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी ते विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील नेत्यांना भरणार असून जागावाटपाबाबत पण चर्चा करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावर उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. मंत्री अमित शाह हे मौज-मजेसाठी मुंबईत येत असल्याचे राऊत म्हणाले आहेत. यावर भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी जोरदार टीका करत संजय राऊत यांना थोडी लाज वाटली पाहिजे असल्याचे म्हटले आहे.

प्रवीण दरेकर म्हणाले की, संजय राऊतला लाज वाटली पाहिजे. खरतर आमचे नेते अमित शाह हे दरवर्षी लागबागच्या राजाच्या दर्शनाला मुंबईत येतात. तसेच उद्याही ते लालबाग गणपती दर्शनाला जाणार आहेत. परंतु, मुंबईत मौज करायला अमित शाह येत आहेत, असे घृणास्पद वक्तव्य संजय राऊत यांनी केले असून त्यांनी लालबागच्या राजाचा सुद्धा अपमान केलेला आहे. उबाठा आता मतांसाठी संपूर्ण हिंदू विरोधी भूमिका घेत आहे आणि हे आता लपून राहिलेले नाही, असे प्रवीण दरेकर यांनी ट्वीट करत उबाठा गटावर टीका केली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख