Thursday, October 10, 2024

सुप्रिया सुळे यांच्यामुळे आमच्यासारखे एकनिष्ठ लोक पक्ष सोडत आहेत

Share

महाराष्ट्र : शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अतिशय विश्वासातील आणि राष्ट्रावादीच्या लेडी सिंघम अशी ओळख असलेल्या तरुण नेत्या सोनिया दुहान (Sonia Duhan) यांनी शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या बद्दल धक्कादायक वक्तव्य केलं आहे. “सुप्रिया सुळे आमच्या नेत्या बून शकल्या नाहीत, सुप्रिया सुळे यांच्या बाजूचे लोक कारस्थान रचत आहेत, त्यांच्यामुळे आणि त्यांच्या आजूबाजूच्या काही लोकांमुळे आमच्यासारखे जे एकनिष्ठ लोक आहेत, ते पक्षाला सोडून जात आहेत,” असा गंभीर आरोप सोनिया दुहान यांनी केला आहे.

“मी आणि धीरज शर्मा आमच्यासाठी शरद पवार हे नेते होते, आहेत आणि यापुढेही राहतील. आमची पूर्ण एकनिष्ठता शरद पवार यांच्यासोबत आहे. आमच्या ज्या खासदार आहेत, ज्या वर्किंग कमिटीट्या अध्यक्षा आहेत, शरद पवार यांच्या कन्या म्हणून सुप्रिया सुळे यांचा खूप सन्मान, आदर आहे. पण सुप्रिया सुळे आमच्या नेत्या बनू शकल्या नाहीत. त्यांच्यामुळे आणि त्यांच्या आजूबाजूच्या काही लोकांमुळे आमच्यासारखे जे एकनिष्ठ लोक आहेत, जे शरद पवार यांच्यासाठी काहीही करायला तयार आहेत, त्यांना संपवायच कारस्थान चालू आहे, ते लोक निर्णय घेत आहेत आणि पक्षाला सोडून जात आहेत”, असा आरोप सोनिया दुहान यांनी केलाय.

अन्य लेख

संबंधित लेख