Thursday, October 10, 2024

देवेंद्र फडणवीसांना केवळ ब्राम्हण म्हणून लक्ष्य

Share

महाराष्ट्र : “जरांगे-शिंदे यांच्याशी वैर नाही, पण देवेंद्र तुझी खैर नाही!” याचा अर्थ मनोज जरांगे, एकनाथ शिंदे आणि पवार हे तिघही मराठा जातीचे आहेत. आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) ब्राम्हण जातीचे आहेत. म्हणजे यांचं राजकारण काय चालू आहे हे महाराष्ट्रातील लोकांना समजला आहे,’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या प्रकरणात वेळीच हस्तक्षेप करायला पाहिजे. कारण, मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन महायुतीत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले.

देवेंद्र फडणवीस साहेबांना केवळ ब्राम्हण आहेत म्हणून लक्ष्य करत आहेत! विशिष्ट संघटनेला बळ देऊन काही पत्रकारांना हाताशी धरून आणि देवेंद्र फडणवीस यांचावर यांचावर जातीयवादातून टीका करायची. म्हणून आज महाराष्ट्रामध्ये जे जातीयवादाचं विष पेरलं जातंय त्याकडे जनता सुज्ञपणे बघतीये.

पवारांचा एक फॉर्मुला आहे, महाराष्ट्राला जातीयतेच्या आगीत झोकणारे शरद पवार पुरोगामी मुखवटा घालून जातीवादाचे विष महाराष्ट्रात पसरवत आहेत. देवेंद्रजी तुम्हाला पुरून उरले देवेंद्रजी कशातच सापडत नाहीत तर त्यांच्या जातीवरती बोला. लिंबाच्या झाडापासून गोड फळांची अपेक्षा करुच नका. ‘जसा बाप तशीच लेक’ असं म्हणत आमदार गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांसह सुप्रिया सुळेंवर जोरदार निशाणा साधला. शरद पवार हे जातीयवादाचं विद्यापीठ आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) या लहानपणीपासून त्यांच्याकडूनच हे सगळं शिकल्या असल्याची जोरदार टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्याबद्दल सहानुभूती दाखवू नका असं बोलतात. अजित पवार तिकडं लाडकी बहिण योजनेसाठी राज्यभरात फिरत आहेत. मात्र इथं सुप्रिया सुळे त्यांच्यातली ‘किडकी बहिण’ महाराष्ट्राला दाखवत असल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख