Saturday, October 12, 2024

हिंदुत्व जागृत करण्याची वेळ आली आहे – देवेंद्र फडणवीस

Share

कोल्हापूर : “आम्ही सहिष्णू आहोत, कुठल्याही धर्मावर अन्याय करत नाही मात्र आता हिंदुत्व (Hindutva) जागृत करण्याची वेळ आली आहे. आपली संस्कृती हजारो वर्ष जुनी आहे, ती टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे,’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान,कणेरी मठ,कोल्हापूर येथे धर्मचिंतनाकरिता ‘संत समावेश कार्यक्रमा’त केले.

ते पुढे म्हणाले, देशात सांस्कृतिक पुनरुत्थानाचे काम मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करत असताना राज्यात गोमातेच्या संवर्धनाच्या दृष्टीने दोन महत्वाचे निर्णय घेतले. देशी गोमातेला ‘राज्यमाता’ असे घोषित केले असून गोशाळांमध्ये चाऱ्याकरिता प्रतिदिन ₹50 अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, तसेच यावेळी त्यांनी उपस्थित साधू-संत, महंत आणि धर्माचार्यांशी संवाद त्यांनी साधला साधला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर हिंदू समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली आणि संत एकत्रित होण्यास सुरुवात झाली. मंदिरात जाणार नाही म्हणणारे देखील आता मंदिरात जात आहेत. 50 वर्षांच्या राजकारणानंतर शरद पवारांना आध्यात्मिक आघाडी सुरु करावी लागली ही सांस्कृतिक पुनरुत्थानाची ताकद आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी देव,देश आणि धर्माकरिता लढण्याचा मंत्र दिला होता. देशामध्ये पुन्हा एकदा संत संस्कृतीचे महिमामंडन सुरु झाले आहे. देव,देश आणि धर्माकरिता सामान्य माणसांमध्ये प्राण फुंकण्याचे काम धर्माचार्यांनी केले.

जे हिंदुत्व प्रखरतेने मांडतात अशा लोकांच्या पाठीशी समाज उभा राहतो म्हणून या समाजात भेदाभेद निर्माण करण्याचे षडयंत्र सध्या पाहायला मिळत आहे. लव्ह जिहाद, धर्म परिवर्तनासोबत निवडणुकीमध्ये व्होट जिहादचा प्रकार पाहायला मिळाला. आम्ही सहिष्णू आहोत, कुठल्याही धर्मावर अन्याय करत नाही मात्र आता हिंदुत्व जागृत करण्याची वेळ आली आहे. आपली संस्कृती हजारो वर्ष जुनी आहे, ती टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.

यावेळी भाजपा आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले, शंकराचार्य विद्या नृसिंह भारतीजी, योगी निरंजननाथ महाराज तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून सर्व संप्रदायाचे प्रमुख, साधू-संत, महंत, वारकरी, प्रवचनकार, आध्यात्मिक प्रमुख आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख