Sunday, November 24, 2024

उद्धव ठाकरेंकडून भगव्या ध्वजाचा अवमान

Share

उद्धव ठाकरे : उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भगव्या ध्वजाबद्दल गरळ ओकली आहे. “संघाचं फडकं देशाचं निशाण होऊ शकत नाही” म्हणत त्यांनी भगव्या ध्वजाचा अवमान केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केलंय. लोकसभेत त्यांना ४०० वर जागा संविधान (Constitution) बदलण्यासाठी पाहिजेत असा आरोप पण त्यांनी यावेळी भाजपवर केलाय.

उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल त्यांचा राग आहे. एक तर महाराष्ट्रात जन्मलेला माणूस आणि दलित कुटुंबात जन्मलेला विद्वान माणूस त्यांना खटकत आहे. त्यांच्याबद्दलचा द्वेष आहे. म्हणूनच ते संविधान बदलत आहेत. बाबासाहेबांनी लिहिलेली घटना कशी मानायची? म्हणून त्यांना घटना बदलायची आहे असेही ठाकरे यांनी सांगितले. तसेच, नड्डा बोलले की देशात एकच पक्ष राहील. पूर्वी एक विधान, एक निशाण एक प्रधान आहे असे ते म्हणाले. आम्हाला वाटले होते की, तिरंग्यासाठी करत आहेत. पण स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे यांच्या कार्यालयावर तिरंगा फडकत नव्हता. यांचं फडकं फडकत होतं. ते फडकं देशाचं निशाण होऊ शकत नाही. आमच्या देशाचा तिरंगा हा तसाच राहणार आहे. संविधान तसेच राहणार आहे. पंतप्रधान लोकांनी निवडून दिलेलाच राहणार आहे. पुतीनसारखा निवडून येणार नाही, अशी टीका त्यांनी संघावर केली.

अन्य लेख

संबंधित लेख