Monday, October 7, 2024

उधोजीराव तुम्हारा चुक्याच, पण चुकीला माफी नाहीच 

Share

उधोजीरावांनी हिंदूद्रोही पक्षांशी युती करून चूक केली असून काळाच्या ओघात त्यांनी हिंदुत्वाचा त्याग करून आपल्या वैचारिक भ्रष्टाचाराचे दर्शन दिले.

उधोजीराव बाळासाहेब ठाकरे यांनी बीकेसी मैदानावर झालेल्या सभेमधे पुन्हा एकदा भगव्याशी द्रोह केल्याचे दिसून आले. या सभेत भगवा ध्वज जणूकाही गायब झाला होता. यापूर्वी ठाकरे कुटुंबाची सभा म्हणजे अवघे वातावरण भगव्याने भारून जायचे. बीकेसीवर एवढे सगळे झेंडे होते की, भगवा बिचारा स्वतःहून आकसून गेला. मात्र, उधोजीरावांच्या सभेत त्यांना अलीकडे प्रिय झालेला हिरवा झेंडा दिमाखात फडकत होता. तोही चांदताऱ्यासहित. एरवी उठता बसता शिवकालीन शब्दांचा वापर करून पोकळ ढोसबाजी करणारे उधोजीराव हा सारा प्रसंग केविलवाण्या पद्धतीने बघत होते.

ऊधोजीराव, तुमच्या हे लक्षात आले असेलच की, अपेक्षेप्रमाणे मनसेचे संस्थापक राज ठाकरे यांनी काकांची परंपरा शीवतीर्थावर मनोभावे पाळली. कदाचित, सख्ख्या चुलत भावाचे हे वर्तन आपल्याला आगाऊपणा वाटू शकते. परंतु अवघ्या महाराष्ट्राने जे काही बघायचे ते डोळे उघडे ठेवून आणि कान जागे करून बघितले.

भाजप बरोबर छोटा भाऊ मोठा भाऊ असा खेळ करणाऱ्या उधोजीरावांना काॅंग्रेस आणि शरद पवार यांनी त्यांची जागा बीकेसीमध्ये दाखवून दिली. भाजप बरोबर युती असताना उधोजीरावांचा अहंकार भलताच संवेदनशील होता. बीकेसीमध्ये उधोजीरावांना सर्वांच्या आधी भाषण करायला लावून काॅंग्रेसने उधोजीरावांना त्यांची लायकी दाखवून दिली.

हा अपमान गिळण्याशिवाय उधोजीरावांना पर्याय नाही. कारण त्यांना भगव्याचे विस्मरण झाले. केवळ विस्मरणच नाही तर त्यांनी भगव्याचा घनघोर अपमान केला. उधोजीरावांनी हिंदूद्रोही पक्षांशी युती करून चूक केली. काळाच्या ओघात त्यांनी हिंदुत्वाचा त्याग करून आपल्या वैचारिक भ्रष्टाचाराचे दर्शन दिले. परमप्रिय आणि प्राणाहून श्रेष्ठ भगव्याचा उल्लेख ‘फडके’ असा करणाऱ्या उधोजीरावांकडून अन्य काय अपेक्षा करणार? इतके नक्की की ‘उधोजीराव तुम्हारा चुक्याच’ आणि चुकीला माफी नाहीच. २० मेला बघाच.

सत्यजित जोशी(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख