Monday, January 26, 2026

उद्धव ठाकरे फक्त तोंडाच्या वाफा घालत आहेत, ठाकरे-राऊत वाटेल ते बरळत असतात; भाजपा आमदाराची घणाघाती टीका

Share

कणकवली : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आपली ताकद कमी झाली ही वस्तुस्थिती स्वीकारायला तयार नाहीत. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना जरी जागा मिळाल्या असल्या तरी मूळ शिवसैनिक एकनाथ शिंदे आणि महायुतीसोबत आहेत. अमित शाह यांचे नेतृत्व देशाने स्वीकारलेले आहे. गृहमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय या देशाने पाहिलेले आहेत. त्यांचा फडशा उद्धव ठाकरे कसा काय पाडू शकतात. ठाकरेंना फक्त तोंडाच्या वाफा घालवायच्या आहेत. त्यामुळे ते आणि संजय राऊत वाटेल ते बरळत असतात, अशी टीका भाजप (BJP) आमदार प्रविण दरेकरांनी (Pravin Darekar) केली आहे. दरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी कणकवली येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

अन्य लेख

संबंधित लेख