Friday, November 8, 2024

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर

Share

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नसला तरीही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीतून त्यांनी ६५ उमेदवार जाहीर केले आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठीच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुती (Mahayuti) आणि महाविकास (MahavikasAghadi) आघाडीच्या जागावाटपाच्या वाटाघाटी शेवटच्या टप्प्यात आहे. महाविकास आघाडीचं जागावाटप आज अंतिम होईल, असा विश्वास विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज व्यक्त केला

https://x.com/ShivSenaUBT_/status/1849076416643842229



नाशिक जिल्ह्यातील नाशिक मध्य, नाशिक पश्चिम आणि मालेगाव बाह्य मतदारसंघातील उमेदवारांना मातोश्रीवर एबी फॉर्म देण्यात आले आहेत. शिवसेना युबीटी पक्षाने माहीम मतदारसंघातून शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर केला आहे. येथील मतदारसंघातून अमित ठाकरेंविरुद्ध उद्धव ठाकरेंकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर, इतरही मतदारसंघातील नेतेमंडळी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेत आहे. त्यामुळेच, शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाकडून नाशिक जिल्ह्यातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तर, आज तब्बल 40 उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलंय. गेल्या काही दिवसांपासून नाशिक (Nashik) जिल्ह्यात गुन्हा दाखल झाल्यामुळे चर्चेत असलेल्या शिवसेनेच्या सुधाकर बडगुजर यांना ठाकरेंकडून उमेदवारी देण्यात आली आहे. यासह, वसंत गितेंनाही ठाकरेंनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

अन्य लेख

संबंधित लेख