Thursday, January 16, 2025

उद्धव ठाकरे, राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल

Share

नागपूर : महाराष्ट्राच्या महायुती सरकारची मंत्रिमंडळाची शपथविधी आज नागपूर येथे उत्साहात पार पडली. या शपथविधीनंतर, भाजपचे आमदार नीलेश राणे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा… आता तरी कुणासोबत कपटीपणाने वागू नका” अशी आगपाखड नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी सोशल मीडियावर ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

निलेश राणेंची ट्वीटर पोस्ट जशीच्या तशी

श्री. उद्धव ठाकरे,

तुम्हाला सांगायला आनंद होतोय, तीन राणे तीन सभागृहात पोहोचले आहेत. एक खासदार, एक मंत्री आणि एक आमदार. तुम्ही २००५ पासून राणे कुटुंबाला संपविण्याचे टोकाचे प्रयत्न केले, काही काळ तुम्हाला यश मिळालं पण आज नितेशला मंत्रीपदाची शपथ घेताना बघितल्यावर एक जाणीव झाली की देव काही काळ परीक्षा घेतो पण नंतर जो प्रमाणिक आहे त्याच्या सोबत उभा राहतो आणि जो कपटी असतो त्याला काही काळ यश मिळते पण नंतर त्याचा बंदोबस्त होतो. उद्धव ठाकरे तुम्ही कुणासोबत चांगले वागलात नाहीत म्हणून तुमच्यावर ही परिस्थिती आली.

राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा…

आता तरी कुणासोबत कपटीपणाने वागू नका, तुम्हाला ही मी शुभेच्छा देतो कारणं पडत्या काळात समोरच्याला कमी लेखायचे नसते. तुमच्या मुलांनाही अक्कल द्या जर त्यांची घमेंड उतरली असेल तर, नाहीतर तुमच अजून कठिन होईल.

जय महाराष्ट्र!

अन्य लेख

संबंधित लेख