Tuesday, July 1, 2025

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर

Share

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. आज संध्याकाळी साडेपाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचं आगमन होईल. त्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजता मुंबई समाचारच्या द्विशताब्दी निमित्त तयार केलेल्या लघुपटाचं ते अनावरण करतील.

१८२२ मधे मुंबईत सुरु झालेलं हे गुजराती वर्तमानपत्र आशियातल्या सर्वात जुन्या वर्तमानपत्रांपैकी एक आहे. गृहमंत्री शाह उद्या दिवसभर मुंबईतल्या विविध भागातल्या गणेश मंडळांना भेट देणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी तसंच त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन ते गणपती दर्शन घेतील. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला आणि त्यानंतर वांद्रे पश्चिमेतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला शाह भेट देणार आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख